Thursday, September 13, 2018

गेट टुगेदर

नमस्कार माझ्या  शाळकरी मित्रानो,

गेट टुगेदर हा शब्द जरी कानी पडला तरी माझ्या तल्लख मेंदूला एकाच माणसाची आठवण येते तो म्हणजे श्रीयुत अरुण पवार, आमच्या अण्णासाहेब  वर्तक  स्मारक विद्यामंदिर शाळेच्या १९९३-९४ बॅच च्या गेट टुगेदर चा कर्ता-धर्ता व सर्वांकडून करविता असे सर्व काही, 
तर ह्या पवार साहेबांचा मेसेज आला आपल्या आत्ता झालेल्या चवथ्या गेट टुगेदर विषयी लिह, मी म्हटले मी काय लिहणार, आपली धाव आपल्या ओळखीच्या मित्र परिवाराचे वाढदिवसाचे पानभर मनोरंजक शुभेच्छा पत्र लिहण्या पर्यंतच, इतके कसे लिहणार? तरी म्हटले सुरवात तर करूया, मग पुढचे पुढे.....

सुरवात तर अरुण पासूनच होणार, तर हा आमचा अरुण अभ्यासात हुशार (अ वर्गात कार्पेन्टर घेतल्याने गेला असणार नक्की) नसला तरी, जनसंपर्क दांडगा, आणि सर्वाना हवाहवासा वाटणारा, तसे पहिले तर हा माणूस आणि मनीष पी. मला शाळेत असलेले अजिबात खरंच आठवत नाही, तसे मीच दहावी नंतर विरार सोडले पण आता ओळख झाल्यानंतर माणूस ठीक वाटला, दिसतो तितका ....  नाही असो .... !

मुळात अरुण ने व्हाट्सअँप ग्रुप बनवला किलबिल ग्रुप च्या किलबिलाटाला कंटाळून, आणि नाव दिले "मुलांचा कट्टा ९४", अर्थात त्यात फक्त मुलेच होती हे वेगळे सांगायला नको (९०% अ मधली), २१ जून २०१५ रोजीची हि घटना, सुरवातीला फक्त आठ जण होते नंतर चंपक पाटील व इतरांनी ग्रुप बांधणीचे कार्य सुरु केले,जुने मित्र शोधण्यासाठी त्यांच्याकडे फेसबुक हे प्रभावी माध्यम होते, परंतु सामान नावे असलेले अनेक जण होते, त्या प्रत्येकाबरोबर चाट करून हाच तो हे कन्फर्म करून, व ग्रुप मध्ये सामावून घेण्याची परवानगी घेऊन त्यांना ऍड करत गेले, अनेक मित्र हळूहळू या ग्रुपमध्ये सहभागी होत गेले आणि ‘गेट टुगेदर’ची संकल्पना पुढे आली. दिवस ठरला ऑगस्ट मधला दुसरा शनिवार रविवार, ठिकाण ठरत नव्हते, म्हणून पराग ने त्याच्या चिंचणी च्या सी फेसिंग असलेल्या घराची कल्पना पुढे केली, तरी काहींनी कल्टी मारली आणि आपले सात वीर तिथे पहिली GT करून सुखरूप घरी आले.
असाच ग्रुप वाढत गेला पुढे दुसऱ्या वर्षी जुलै २०१६ मध्ये GT करण्याचे ठरले, रात्री साठी जागा मिळत नव्हती चंपक पाटलांनी जेट्टी जवळच्या स्वतःच्या  घराची कल्पना मांडली, अर्थात सर्वानुमते मान्य झाली, सतरा जण तिथे भेटले, मी ह्या मर्कटांच्या बोस्ड टोळीत ह्याच मुहूर्तावर सामील झालो, GT च्या दुसऱ्या दिवशी मी विरार ला नातेवाईकांकडे दिवसकार्याला गेलो होतो, दहावी नंतर माझ्या संपर्काचे असलेलं एकमेव व्यक्तिमत्व श्रीयुत विशाल प्रभाकर मेहेर यांचे दुकान रस्त्यात लागते म्हणून भेटायला वळलो, त्याने GT विषयी सांगितले, मी रत्नदीप, विशाल, अमित, शिर्के सारखे महानुभव भेटतील ह्या आनंदाने लगेच  होकार दिला, दुपारी एक वाजता विश्वासरावांची चारचाकी घेऊन आम्ही निघालो, वाटेत फक्त कोण कसा दिसत असेल कसा ओळखायचा हाच विचार चालू होता, २२ वर्षांनी भेटणार होतो, वाटलेच नव्हते असे काही अचानक भेटतील असे, ह्या बद्दल मी विशालचा खरंच आभारी आहे.

तिथे पोचलो आणि अवाकं च झालो, चाफेकर आणि राज सोडून कोणीच ओळखीचे वाटत नव्हते, त्यात एक पॉट सुटलेला जाडजूड माणूस मेहेराला विचारात होता कोण आलाय तुझ्याबरोबर,  जसे त्याला समजले आपल्याच बॅच चा आहे, लगेच पैसे काढ म्हणाला ना. एक तर मला कोणी ओळखीपाळखीचे दिसत नव्हते त्या हा...

मग मला सर्वानी त्यांची नावं सांगितली, काही नावं आठवत होती, आमच्या बाजूच्या वाडीतील चेतन दादा (अभ्यासू - मला नेहमी ह्याचा हेवा वाटायचा), राज अमित भेटले, राजे शिर्केनी रणांगणातून काढता पाय घेतला होता म्हणून ते भेटले नाहीत. रत्नदीप विषयी विचारले, तेवढ्यात एक काका सारखा दिसणारा माणूस स्कुटी वरून हाफ चड्डी व बनियान वर बिअर चा बॉक्स घेऊन आला सर्वानी सांगितले हाच तो, विश्वासच बसेना :)

सकाळचे जेवण व नाश्ता सर्वानी मिळून बनवले होते, अमित पेडणेकर कांदा कापतानाचा फोटो बघून
कळले, सर्व जण आपापले खाणे पिणे यात मग्न होते मात्र, प्रशांत देशमुख नॉनव्हेज बनवण्यात व इतरांनी त्याची स्तुती करण्यात धन्यता मनात होता. तरीही त्याने करून आणलेली वजडी डाळ तिखट झाली म्हणून काही नतद्रष्ट बोंबा मारत होते.
नंतर आम्ही सर्व बीच वर गेलो, सर्वांशी गप्पा मारल्या कोण सध्या काय करतोय ते कळले, चाफेकरच्या भुताच्या गोष्टी ऐकल्या (खऱ्या कि खोट्या तोच जाणे).
संध्याकाळ झाली सर्व आपापल्या घरी निघण्याची तयारी करू लागले, काही अरुणला पॅकिंगला मदत करण्यासाठी थांबले. मला मेहेर म्हणाला आपण निघू अरुण चा हाच बिझनेस आहे. त्याला फायदा आहे म्हणून तो थांबलाय :).
अशी झाली दुसरी GT ची सांगता
तिसरी GT हि चांदीप येथे आयोजित केली होती. ती ऑगस्ट २०१७ मध्ये झाली त्याला २९ जण उपस्थित होते. त्यात १२ जण पूर्णतः नवीन आलेले होते.
आधीच्या सर्व GT ला जमलेले सर्व जण मिळून जेवण बनवायचे. पण २९ जण त्यात १२ नवीन असल्याने सर्वानुमते जेवण बाहेरून बनवून घेण्याचा निर्णय झाला. त्याप्रमाणे तयारी झाली, अरुण,चंपक व काही साथीदार आधी जाऊन तयारी ला लागले, खाण्याची व्यवस्था झाली तरी इतर व्यवस्था स्वतः करायची होती त्याचेच खूप टेन्शन असते. तरी सर्व काही व्यवस्थित जमले आणि तिसरा GT समारंभ व्यवस्थित व सुखरूप पार पडला.

आपला व्हाट्सअँप ग्रुप हा फक्त व्यावसायिक मित्रांचा ग्रुप नाही, येथे मैत्री हि  भावनिक आहे, आताच्या पिढीत जरी आपण व्यावसायिकरित्या यशस्वी  झालो असलो तरी जुने मित्र व तेव्हाच्या आठवणी यात आपल्या पिढीची  एक घट्ट वीण आहे. आता असे संशोधन झाले आहे कि सात वर्ष जी मैत्री टिकते ती जन्मात कधीच तुटत नाही.

मध्ये आपण शाळेला काही देणे लागतो वगैरे वगैरे..... म्हणून एक वेगळा ग्रुप तयार झाला ऍडमिन अर्थातच अरुण पवार. काय करायचे, काय द्यायचे यावर वेगवेगळे विचार आले, काही खुप ऍक्टिव्ह झाले, काही नेहमी प्रमाणे पुढे पुढे करू लागले,  काहींना ग्रुप मधून काढण्यात आले (मला हि काढले पण परत घेतले), काही स्वतः गेले, तसा तो गुप आता शांत आहे

एक वर्ष लोटले नेहमीप्रमाणे वाढदिवस, प्रत्येकाचे सुखदुःख ग्रुप वर शेअर झाले, सर्वानी सारखेच वाटून घेतले. आणि पुन्हा एकदा ऐतिहासिक चवथ्या GT ची चाहूल लागली. तसं पाहिलं तर ह्या GT ची नांदी दोन महिन्यापुर्वी झाली. जून च्या १० तारखेला अरुण ने ग्रुपवरुन एक पिल्लु सोडलं होतं.ते पिल्लु डोक्यात वळवळत असल्याने आम्ही उत्साहाने गटगसाठी होकार दिला खरा. पण पहिल्याच मिटींगमधे खूप कमी जण आल्याने उत्साह डळमळीत होऊ लागला. तरी अरुण ने दुसरी मिटिंग घेतली, आणि ठरलेल्या गोष्टी ग्रुप वर शेअर केल्या तारीख व ठिकाणाबद्दल सर्वांची मते घेण्यात आली,

 'हे विश्वची माझे घर'असल्याप्रमाणे आमची मित्रमंडळीही अशी जगभर सगळीकडे पसरली आहेत ,त्यांची एकत्र मोट बांधली जाईल तेव्हा जाईल पण निरोपाविरोपीला तर सुरूवात झाली.

१० वी नंतरही आत्तापर्यंत आमच्यातील काही मित्रमैत्रिणी आवर्जून भेटतात .पण आता वाढत्या भौतिक अंतरांमुळे घाऊक प्रमाणातल्या प्रत्यक्ष भेटी फार कमी झाल्यात. पण मी राहतो पालघरला, काही मुंबई, पुणे,काही अमेरिका, यूएई ते थेट बोर्डी पर्यंत काहीजण शिफ्ट झाल्यात, असो..

प्रत्यक्ष गेट टुगेदरच्या आधी २-३ दिवस सगळ्यांना फोन करुन पुन:पुन्हा बजावण्यात गेले.
GT चा दिवस उजाडला, ह्या GT साठी आम्हा पामरांना काय काय दिव्या पार करावी लागतात आम्हीच जाणतो, अश्या GT वेळी गृहमंत्राना माहेरी पाठवावे लागते, पण या वेळी माहेरी पाठवण्याचा प्लॅन फसला होता, बॅग तर भरलेली तरी शेवटच्या क्षणापर्यंत धाकधूक होती, पण इतके लांबून मित्र येणार वगैरे समजावल्यावर संमती मिळाली एकदाची, संध्याकाळी मी विरारला पोचलो, तेजा प्रवीण उदमले च्या शोरूम मध्ये माझी वाट पाहत बसला होता, मग प्रवीणने कामगारांना सूचना देण्यात ४० मिनिटे घालवली, नंतर सांगितले के चाफेकर बरोबर खुळे त्याच्या चारचाकीतून येणार आहेत, आम्ही अर्धा तास  वाट पहिली मग ऍक्टिव्हा घेऊन तिघे निघालो मधेच चाफेकरचा परत फोने आला परत थांबलो, १ तासाने २ महाशय अवतीर्ण जाहले. तो पर्यंत सुवासिक पानाचा घामघाट  माझ्या बाजूला दरवळत होता, थोडा पुढे गेल्यावर राजे शिर्के विरारमध्ये आल्यात हे मी सर्वाना सांगितल्या बरोबर मला शिव्या पडल्या, लगेच डोफे-शिर्के जोडी ला फोन लावले गेले, डोफेनी दरवर्षी सारखी टांग दिली, शिर्के आपली SUV घेऊन ३ वेळा निघाले. पण पोहचत नव्हते, आता तेजा चा धीर सुटायला लागला होता,
शिर्के वर विश्वास नव्हता आणि जगातील सर्वांत जुने व सर्वाधिक सेवन केले जाणारे, गहू, सातू, मका, तांदूळ इत्यादी धान्यांपासून बनवलेले मद्य संपेल कि काय अशी भीती होती, आम्हाला मात्र अरुण वर विश्वास होता (तसा तेजा सोडून आमचा सर्वांचा १२ नंतर सुटणारा शनिवार होता :) ),
शिर्के आले, शिर्के म्हणजे आमचे शाळेतले लाडके व्यक्तिमत्व, त्याच्या लीला अपरंपार त्यावर पूर्ण लेख हि कमी पडेल,
झाले "क" तील १ जण तरी भेटतील ऐकून बरे वाटले, तसा माझा शाळेत ६ वि ते १० वि "इ" ते "क" असा प्रवास व सतत ट्युशन बदलत असल्याने व इतकी वर्ष संपर्क तुटल्याने ग्रुपमुळे भेटलेले सर्व जण मला आपल्याच वर्गातील वाटत होते.

आम्ही ६ जण निघालो, तिकडे अरुण, राज,चेतन, मनीष, गिरीश  व इतर असे २२ जण ४.३० वाजता रिसॉर्ट वर पोचले होते, खाण्या पिण्याचे व्यवस्था वर शेवटची नजर मारत होते, राहिलेल्या गोष्टी जे येत होते त्यांच्याकाढून मागवत होते, काही  येणाऱ्यांना रस्ता समजावून सांगत होते, रवींद्र सारखे काही धावती भेट देऊन गेले,विकी बोर्डीवरून, व प्रशांत पुण्यावरून आमच्या आधी पोहचले होते, त्यांचे फोटो  ग्रुप वर येत होते, स्विमिंग पूल व इतर जागा पाहून रिसॉर्ट ठीक वाटत होते,
आमच्यातला फक्त प्रवीण आधी त्या रिसॉर्टला गेला होता, रुग्णवाहिका सारथी व रस्ता माहितगार व्यक्ती होते तरी आम्ही रास्ता चुकलोच..
कसेबसे शेतातल्या कच्च्या चिखलाच्या रस्त्यातून गावाच्या छोट्या गल्लीतून प्रवास करत आम्ही एकदाचे पोहचलो,
बाहेरच 'अभि तो पार्टी' च्या गाण्याचा ताल ऐकु आला.. . तेव्हाच समजले पार्टी कधीच सुरु झालय,
यंट्री केल्यावर हशा, प्रेमाने दिलेल्या शिव्या, टाळ्यांचे चित्कार ऐकु आले, गळाभेट झाली आणी दोन वर्षांपुर्वी भेटलेले एकेक चेहरे दिसु लागले.
१५-१६व्या वर्षी विखुरलेले पस्तिशीनंतरच एकत्र आले होते, 
प्रत्येक नवीन येणाऱ्या मित्राची एन्ट्री सुद्धा तितकीच जोरदार होत होती.
आल्याबरोबर सर्वाना आधीच्या तीन GT च्या एका फोटो फ्रेम चे वाटप करीत होते,

मग अरुण ने प्रस्ताव मांडला की आपण आपापली ओळख करुन द्यावी. कारण काही अगदीच नवीन होते,

"विवेक अंजने सध्या वडोदरा ला असतो त्याला सहसा सुट्टी मिळत नाही, पण त्याने जेव्हा बॉस ला सांगितले कि मी २४ वर्षानंतर मित्रांना भेटायला जातोय, त्याला लगेच सुट्टी मिळाली"
दोन्ही विशाल मेहेरने चांगली भाषणे ठोकली,

रामगडे  ला जबरदस्ती बोलायला उभे केले पण तोंडाच्या पोबाऱ्यामुळे त्याला बोलता आले नाही

प्रशांत खोलकर तर घरी मोठी अडचण असून हि फक्त मित्रांना भेटायला पुण्यावरून आला होता,

आणि नंतर अरुणने तर हे सांगून धक्काच दिला कि एक जण दुबई वरून खास आपल्याला भेटण्यासाठी येत आहे. आमची तर बोलतीच बंद.

नंतर स्टार्टर पासून सुरवात झाली, आमचा शनिवार असल्याने आम्ही व्हेज शोधात होतो,
दर्शन पाटील मला २४ वर्षानंतरच भेटला, पण मी त्याला ओळखलेच नाही, म्हणून त्याला खूप वाईट वाटले (दुसऱ्या दीवशी मात्र न भेटता जात होता ) शिव्या देऊन व काही फटके मारून माझा मेंदू त्याने जागृत केला व मला तो आठवला.

रात्री ११ वाजेपर्यंत काही हवेत उडत होते त्यांना वेसण घालून अरुण ने जमिनीवर आणले, काही गरम घेतल्याने पुल मध्ये थंड होत होते तर काही बाहेर गप्पा मारत, आठवणी काढत चिल्ड मारत होते,

मध्ये मध्ये अरुण दुबई वरून येणार राकेश पाटील कुठे पोचला याचे अपडेट देत होता.

प्रत्येक GT ची जान गिरीश यांनी यावेळी देखील आपले देशी व विदेशी डान्स प्रकार दाखवले.

अरुणच्या एका मित्राने गेल्या ३ GT चा एक सुंदर विडिओ बनवला आहे, तो सर्वानी खूप वेळा पहिला, मी एका फोटोत आहे हे सर्वानी आवर्जून सांगितले.

देखमुख चंपक व किशोर यांनी आम्हाला रात्री १२ नंतर स्वादिष्ट भुजिंग बनवून दिले त्याबद्दल धन्यवाद,

रात्री १ नंतर पत्त्यांचे शाळा स्तरीय पटाईत खेळाडू मैदानात उतरले, अरुण ने न खेळता कमावले, काही रात्री हरले तर काही जिंकले, आणि काही हरलेले परत मिळवू या आशेने बसलेले सकाळी परत हरले. आणि मित्रांसाठी कायपण असे बोलून डाव संपवले.

आमच्यासारखे न खेळणारे ३ पर्यंत आडवे झाले, सकाळी उठून पहिले तर खूप जण गायब होते. सकाळी गरम ऑम्लेट पाव व चहा तयार होता.
नाश्त्या नंतर स्वप्नील विशाल पूल मध्ये उतरले व पाण्यातल्या व्हालीबॉल चे स्किल दाखवू लागले. त्यानंतर आम्ही एक एक उतरलो,
पाण्यातली तीन थरांची दही हंडी "जय जवान" ला हि लाजवणारी होती.

राकेश शेवटी रिसॉर्टला पोहचला, सर्वानी त्याचे स्वागत केले, त्याला मध्ये बसवून त्याच्याशी गप्पा मारल्या, खरोखरच तो कौतुकास पात्र होता.

दर्शन ने सर्वांसाठी "टकीला" आणली मला ८ वर्षानंतर ती घेण्याचा मोह आवरता आला नाही. काहीं भोळ्या लोकांना ते काय आहे हेच माहित नसल्याने दर्शन व चाफेकर यांनी प्रॅक्टिकल करून दाखवले

काही खाण्याच्या शौकीनां साठी फुफुस मागवली होती पण, कुकर फुटल्याने ती खाता आली नाही,म्हणून काही जण खंत व्यक्त करीत होते (बर झाले नाही तर आम्हाला खायला लावले असते)

 १ नंतर जेवण तयार होत नव्हते म्हणून दर्शन स्वतः कामाला  लागला.

खरंच ४७ जणांचे काय हवे नको ते पाहणे, स्वतः बिअर दाखवण्यापुरता हातात धरून, कोणी फक्त अरुण अशी हाक मारल्या बरोबर प्रत्येक वेळी हजर होणे , अमित पेडणेकर व विशाल चे टोमणे ऐकून दुर्लक्ष करणे ह्यासाठी मनावर खूप ताबा व संयम लागतो त्यासाठी हॅट्स ऑफ मित्रा.

जाताना राकेश ने पुढचे GT तो स्पॉन्सर करेल असे सुचवले, अरुण ने नम्रपणे नकार देत, त्याला धन्यवाद दिले. व असे करणे कसे चुकीचे होईल हे समजावले.  एक GT ऍब्रॉड ला करूया असे देखील राकेश ने सुचवले.

शाळेच्या ग्रुप चे आधी रियूनियन आणि मग नियमित–अनियमितपणे होणारी गेटटुगेदर हा दिलासा असतो
या गेटटुगेदर मुळे आणि व्हाट्सअँप ग्रुप मुळे बाकी सगळ्यांशी पुन्हा एकदा कनेक्ट झालो
सर्व कार्यक्रमाचं व्यवस्थापन उत्तम झाल्यामुळे या गेटटुगेदरला एका मेगा इव्हेंटचं स्वरूप आलं होतं.

जेवता जेवता गप्पा, टप्पा, विनोद करताना कार्यक्रम संपत आला तरी कोणीही निघण्याच्या मनस्थितीत नव्हते. पुन्हा व्हाट्सअँप वर फोटोंचा ओघ सुरू झाला. दिवस संपला आणि पुन्हा पुढच्या वर्षी ह्यापेक्षा नव्या जोमाने GT ला  नक्की भेटण्याचे वाचन देऊन निघू लागले.
नेहमीप्रमाणे अरुण व काही मित्र मागे आवराआवर करण्यासाठी राहिले.

“कसं झालं गेटटुगेदर?” घरी आल्यावर बायकोने विचारलं.
“अरे एकदम मस्तं. खूप दिवसांनी सगळ्यांना एकत्र बघीतलं. आयला मी काही फारसा आउट ऑफ शेप नाहीये काय” मॅार्निग वॅाक आणि detoxing juice पासून सुटका होण्याचा एक केविलवाणा प्रयत्नं.


माझ्या या सगळ्या वर्ग मित्रांचा भरपेट उत्साह आणि साथ यांनी हे गेटटुगेदर अविस्मरणीय केलं होतं.


आपला 
जतिन भ पाटील 
अ.व. स्मा. विद्यामंदिर विरार 

Tuesday, December 29, 2015

मंगेश पाडगांवकर

मंगेश पाडगांवकर

 

मंगेश पाडगांवकर
Padgaonkar2.jpg
जन्म नाव मंगेश केशव पाडगांवकर
जन्म मार्च १०, इ.स. १९२९
वेंगुर्ला, ब्रिटिश भारत (वर्तमान सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र)
राष्ट्रीयत्व मराठी-भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, अध्यापन
साहित्य प्रकार कविता
वडील केशव पाडगांवकर
पत्नी यशोदा पाडगांवकर
अपत्ये पुत्र: अजित पाडगांवकर, अभय पाडगांवकर
कन्या: अंजली कुलकर्णी
पुरस्कार महाराष्ट्र भूषण
साहित्य अकादमी पुरस्कार (इ.स. १९८०)

जीवन


मंगेश पाडगांवकर यांच्या लग्नाचे दुर्मिळ चित्र
पाडगांवकरांचा जन्म मार्च १०, इ.स. १९२९ रोजी वेंगुर्ला, ब्रिटिश भारत (वर्तमान सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र) येथे झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठीसंस्कृत या भाषाविषयांत एम.ए. केले. ते काही काळ मुंबईच्या रुइया महाविद्यालयात मराठी भाषाविषय शिकवत होते.

मंगेश केशव पाडगांवकर (मार्च १०, इ.स. १९२९; वेंगुर्ला, ब्रिटिश भारत - हयात) हे मराठी कवी आहेत. सलाम या कवितासंग्रहासाठी यांना इ.स. १९८० साली साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

प्रकाशित साहित्य

साहित्यकृती साहित्यप्रकार प्रकाशक प्रकाशन वर्ष (इ.स.) आवृत्ती
धारानृत्य (कवितासंग्रह) कवितासंग्रह
इ.स. १९५० २००२
जिप्सी (कवितासंग्रह) कवितासंग्रह
इ.स. १९५३ १९५९, १९६५, १९६८, १९७२, १९८६, १९८७, १९९३, १९९४, १९९५, १९९७, २००१, २००३, २००५
निंबोणीच्या झाडामागे (कवितासंग्रह) कवितासंग्रह
इ.स. १९५४ १९५८, १९९६
छोरी (कवितासंग्रह) कवितासंग्रह
इ.स. १९५७ १९८८, १९९९, २००३
शर्मिष्ठा (कवितासंग्रह) कवितासंग्रह
इ.स. १९६० २००३
उत्सव (कवितासंग्रह) कवितासंग्रह
इ.स. १९६२ १९८९, २००१, २००६
वात्रटिका (कवितासंग्रह) कवितासंग्रह
इ.स. १९६३ १९९९, २००२, २००४
भोलानाथ कवितासंग्रह
इ.स. १९६४
मीरा (कवितासंग्रह)
(मीराबाईंच्या भजनांचा अनुवाद)
कवितासंग्रह
इ.स. १९६५ १९९५, १९९९, २००३
विदुषक

इ.स. १९६६ १९९३, १९९९, २००३
बबलगम

इ.स. १९६७
सलाम (कवितासंग्रह) कवितासंग्रह
इ.स. १९७८ १९८१, १९८७, १९९५, २००१, २००४, २००६
गझल (कवितासंग्रह) कवितासंग्रह
इ.स. १९८१ १९८९, १९९७, २०००, २००४
भटके पक्षी (कवितासंग्रह) कवितासंग्रह
इ.स. १९८४ १९९२, १९९९, २००३
तुझे गीत गाण्यासाठी (कवितासंग्रह) कवितासंग्रह
इ.स. १९८९ १९९१, १९९६, १९९८, २००१, २००३, २००४
बोलगाणी (कवितासंग्रह) कवितासंग्रह
इ.स. १९९० १९९२, १९९४, १९९६, १९९७, १९९९, २०००, २०००, २००१, २००२, २००३, २००३, २००४, २००४, २००५, २००६
चांदोमामा (कवितासंग्रह) कवितासंग्रह
इ.स. १९९२ १९९३, १९९३, २०००, २००५
सुट्टी एक्के सुट्टी (कवितासंग्रह) कवितासंग्रह
इ.स. १९९२ १९९३, १९९३, २०००
वेड कोकरू कवितासंग्रह
इ.स. १९९२ १९९३, १९९३, २०००, २००५
आता खेळा नाचा

इ.स. १९९२ १९९३, १९९३, २०००, २००६
झुले बाई झुला

इ.स. १९९२ १९९३, १९९३, २०००, २००६
नवा दिवस

इ.स. १९९३ १९९७, २००१
उदासबोध (कवितासंग्रह) कवितासंग्रह
इ.स. १९९४ १९९५, १९९६, १९९८, २००२, २००५
त्रिवेणी (कवितासंग्रह) कवितासंग्रह
इ.स. १९९५ २००४
कबीर (कवितासंग्रह)
(कबीराच्या दोह्यांचा अनुवाद)
कवितासंग्रह
इ.स. १९९७ २०००, २००३, २००५
मोरू (कवितासंग्रह) कवितासंग्रह
इ.स. १९९९ २००६
सूरदास (कवितासंग्रह) कवितासंग्रह
इ.स. १९९९ २००४
कविता माणसाच्या माणसासाठी (कवितासंग्रह) कवितासंग्रह
इ.स. १९९९ २००२, २००६
राधा (कवितासंग्रह) कवितासंग्रह
इ.स. २००० २००३
वाढदिवसाची भेट

इ.स. २०००
अफाटराव

इ.स. २०००
फुलपाखरू निळ निळ

इ.स. २०००
वादळ ( नाटक) नाटक
इ.स. २००१
ज्युलिअस सीझर (नाटक) नाटक
इ.स. २००२ २००६
आनंदऋतू कवितासंग्रह
इ.स. २००४
सूर आनंदघन (कवितासंग्रह) कवितासंग्रह
इ.स. २००५
मुखवटे (कवितासंग्रह) कवितासंग्रह
इ.स. २००६
काव्यदर्शन (कवितासंग्रह) कवितासंग्रह
इ.स. १९६२
तृणपर्णे (कवितासंग्रह) कवितासंग्रह
इ.स.
गिरकी (कवितासंग्रह) कवितासंग्रह
इ.स.

मंगेश पाडगांवकर यांच्या काही विशेष प्रसिद्ध कविता Source : www.marathi.pro

अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी
 अरुण दाते, यशवंत देव,

 असा बेभान हा वारा, कुठे ही नाव मी नेऊ
 लता मंगेशकर, पं. हृदयनाथ मंगेशकर,

 अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती
 सुधीर फडके, यशवंत देव,

 भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
 अरुण दाते, यशवंत देव,

 भावभोळ्या भक्तीची ही एक तारी
 लता मंगेशकर,

 भेट तुझी माझी स्मरते, अजून त्या दिसाची
 अरुण दाते, यशवंत देव,

 दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे
 अरुण दाते, यशवंत देव,

 धुके दाटलेले उदास उदास
 अरुण दाते, यशवंत देव,

 डोळ्यांमधले आसू पुसती
 सुधीर फडके, यशवंत देव,

 जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा
 सुरेश वाडकर, श्रीनिवास खळे,

 लाजून हासणे अन् हासून ते पहाणे
 पं. हृदयनाथ मंगेशकर,

 सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय?


 सावर रे, सावर रे, उंच उंच झुला
 लता मंगेशकर, पं. हृदयनाथ मंगेशकर,

 शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी
 सुमन कल्याणपूर,

 श्रावणात घननिळा बरसला, रिमझिम रेशिमधारा
 लता मंगेशकर, श्रीनिवास खळे 

गौरव

  • अध्यक्ष, मराठी बालकुमार साहित्य संमेलन, संगमनेर, इ.स. २०१०
  • अध्यक्ष, विश्व साहित्य संमेलन, (इ.स. २०१०)

पुरस्कार